जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष पद स्वीकारताच ॲड. महेंद्र मांडवकर यांच्यावर सर्व स्तरांतून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव!

0
25

रत्नागिरी:- जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष पद स्वीकारताच ॲड. महेंद्र मांडवकर यांच्यावर जिल्ह्यातील सर्व स्तरांतून व समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी जिल्हाध्यक्ष ॲड. मांडवकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तर अनेक जण भ्रमणध्वनि व सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. येत्या काळात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करून रत्नागिरी जिल्ह्यातील युवक – युवती, विद्यार्थी – विद्यार्थिनी, शेतकरी, कष्टकरी, वंचित व कर्मचारी – कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here