आगरवायंगणी (दापोली):- रत्नागिरी जिल्हा कृतिशील हिंदी शिक्षक पुरस्कार 2023-24 हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी प्रदान करण्यात येतो. यावर्षीचा कृतिशील हिंदी शिक्षक पुरस्कार 2023-24 यावर्षाचा पुरस्कार दापोली तालुक्यातील पूज्य साने गुरुजी हायस्कूल पालगडच्या हिंदी विषय शिक्षिका मंजिरी मंगेश शितूत यांना देण्यात आला. माधव सभागृह चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ यांच्यावतीने राज्य हिंदी मंडळाचे अध्यक्ष अनिल कुमार जोशी यांच्या हस्ते देण्यात आला.

याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद कडवईकर, उपाध्यक्ष सत्यवान दळवी, राजेश खांबे आदी मान्यवर उपस्थित होते. दापोली हिंदी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शीतूत मॅडम यांचे अभिनंदन केले. साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद रावजी केळकर, इतर संस्थाचालक, मुख्याध्यापक प्रसाद पावशे तसेच सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.