कोल्हापुरातील जयसिंगपूर उदगाव येथे हलवण्याच्या हालचाली सुरू.
रत्नागिरी:- इंग्रजांच्या काळापासून रत्नागिरीत सुरू असलेले प्रादेशिक मनोरुग्णालय कोल्हापुरातील जयसिंगपूर उदगाव येथे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे उदगाव येधील ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील मनोरुग्णालय बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या या ठिकाणी १३० रुग्ण कार्यरत असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. रत्नागिरीतील प्रादेशिक मनोग्णालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी आहे. रुग्णालयास सुमारे ३६५ खाटांची मंजुरी आहे.