आपले सरकार सेवा केंद्र संगणक तज्ञ ब्लॉक व्यवस्थापक कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाला आमदार किरण सामंत यांनी दिली भेट.

0
12

तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा आमदार किरण सामंत यांनी दिला शब्द; उपोषणकर्त्यासमोरच आमदार किरण सामंतांनी केला अधिकाऱ्यांना फोन.

नागपूर:- हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आपले सरकार सेवा केंद्र संगणक तज्ञ ब्लॉक व्यवस्थापन कर्मचारी संघटनेने नागपूर येथील यशवंत स्टेडियम या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि आपल्या मागण्यांना न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आमरण उपोषणासाठी लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांनी भेट घेऊन त्यांची माहिती घेतली.

आपले सरकार सेवा केंद्र संगणक तज्ञ ब्लॉक व्यवस्थापन कर्मचारी संघटनेने च्या मागण्यांमध्ये सर्व तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक, हार्डवेअर अभियंता यांना नवीन कंपनीत होते त्या पूर्वपदावर सामावून घेऊन पूर्व नियुक्ती देणे आणि जुलै 2004 पासून सर्व तालुका व्यवस्थापन, जिल्हा व्यवस्थापक यांना मागील थकीत पगार मिळावा या प्रमुख मागणीला घेऊन महाराष्ट्रातील संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नागपूर अधिवेशनाच्या समोरील भागात यशवंत स्टेडियम वरती आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

याबाबत आमदार किरण सामंत यांनी पूर्ण माहिती घेऊन येथील उपोषण करताना भेट दिली आणि त्या ठिकाणाहूनच संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून उपोषणकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करत मार्ग काढण्याचेही सूचना दिल्या. सोबत रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य राजू कुरूप, तसेच संघटनेचे पदाधीकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here