प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मोठी घोषणा!
मुंबई:- राज्यामध्ये काँग्रेस सरकार (Congress Government) आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना (Mahalakshmi Yojana) महिलांसाठी आणू. यात तर महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात हजार रुपयांची वाढ करू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) स्वागतच केले आहे. मात्र ती योजना कायम राहावी, भगिनींची दिशाभूल होऊ नये, बँकेत पैसे गेले ते बँक वाल्यांनी गायब केले, असे होऊ नये, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकार इव्हेंट करत आहे.
या इव्हेंटच्या माध्यमातून लूट चालू असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे. मात्र, भगिनींना बँकेत किती त्रास आहे माहित आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही या पेक्षा चांगली योजना आणणार असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. महालक्ष्मी योजनेच्या नावाने ही योजना आणणार असून त्यामध्ये मात्र महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच त्यात दर वर्षी एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.