रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने लांजा, राजापूर, हातखंबा येथे जंगी स्वागत करण्यात आले. श्री. राणे चिपळूण दौऱ्यावर होते. त्यावेळी हातखंबा येथे त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
श्री. राणे यांचे स्वागत लांजा, राजापूर या ठिकाणीसुद्धा करण्यात आले. या वेळी भाजपाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, लांजा-राजापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख उल्का विश्वासराव, राजापूर तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, भाजपा ओबीसी प्रदेश सरचिटणीस अनिल करंगुटकर, भाजपा महिला आघाडीच्या सुयोगा जठार, शीतल पटेल, दीपक बेंद्रे, अरविंद लांजेकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, सौ. ऐश्वर्या जठार, रत्नागिरी शहराध्यक्ष राजन फाळके, विनय मुकादम, आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरीतील निवळी येथील भाजपाचे कार्यकर्ते वैभव पवार यांच्या निवासस्थानी नारायण राणे व सौ. नीलम राणे यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेला गणपती बाप्पाचे तसेच सत्यनारायण महापूजेचे दर्शन केले. निवळी, हातखंबा येथे श्री. राणे व सौ. राणे यांनी लहान मुलांचेदेखील कौतुक केले. श्री. राणे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.