Nitesh Rane meets Devendra Fadanvis: आमदार नितेश राणेंनी सहकुटुंब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी घेतले गणेश दर्शन!

0
71

शिवछत्रपतींची प्रतिमा दिली भेट.

मुंबई:- भाजपा प्रवक्ते, लोकप्रिय आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे सहकुटुंब दर्शन घेतले. पत्नी ऋतुजा, चिरंजीव निमिष यांच्यासह आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांच्या घरी श्रीगणेशाचे दर्शन घेतले. शिवछत्रपती महाराजांची प्रतिमा नितेश राणे यांनी फडणवीस यांना भेट दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्साहाने राणे कुटुंबाचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांच्या खास मर्जीतील युवा नेता म्हणून आमदार नितेश राणे यांची ओळख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here