Nitin Gadkari on Prime Minister Post: ‘विरोधकांनी मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती’

0
60
nitin gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा गौप्यस्फोट!

नागपूर:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी केला आहे. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली, असंही ते म्हणाले आहेत. नागपूर येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात उपस्थित लोकांना संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र मी ती नाकारली. मी नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा व्यक्ती आहे. मी अशा पक्षात आहे ज्याने मला जे हवे होते ते सर्व दिले आहे. कोणताही प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही. असं असलं तरी नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेत्याचे नाव उघड केले नाही किंवा घटनेची माहितीही दिली नाही. ते म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एका वरिष्ठ विरोधी पक्ष नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता.

दरम्यान, दरम्यान, देशात पंतप्रधान पदावरून नितीन गडकरी यांच्या नावाची नेहमीच चर्चा होत असते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळालं होतं. त्यावेळीही लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आलं होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. या निवडणुकीत भाजपनं २४० जागा जिंकल्या. त्यामुळं भाजपनं डीटीपी व जेडीयूच्या मदतीनं केंद्रात सरकार स्थापन केलं आणि नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या सरकारमध्ये नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here