राजापूर:- तालुक्यातील पडवे केंद्राची केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा नुकतीच केंद्रशाळा पडवे येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये केंद्रातील नऊ शाळांमधील मोठ्यासंख्येने खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये विल्ये जिल्हा. परिषद शाळा नं.2 शाळेच्या खेळाडूंनी सांघिक आणि वैयक्तिक खेळांमध्ये लक्षवेधी कामगिरी करीत प्रशाळेने केंद्रस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. लहान गटातील कबड्डी, लंगडी या सांघिक खेळामध्ये मुलगे आणि मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
तालुक्यातील पडवे केंद्राच्या नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये विल्ये जिल्हा परिषद शाळा नं. 2 च्या खेळाडूंनी सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात सुयश संपादन केले. त्यामध्ये 50 मी. धावणे ः वरद संदीप तावडे, सुयोग दिलीप राणे, उंच उडी ः वरद संदीप तावडे, ओमकार विकास राणे, लांब उडी ः जोहान रमजू कोतवडकर, सुयोग दिलीप राणे, गोळाफेक जोहान रमजू कोडवडकर. लहानगट-मुली ः 50 मी. धावणे ः अवंतिका दिपक सावंत, उंच उडी ः स्वरा संतोष परवडी, लांब उडी ः फिजा इम्रानखान भाटकर यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशाळेचे मुख्याध्यापक दिलीप झिंबरे, उपशिक्षक संजय बाईत, जितेंद्र भोये यांचे मार्गदर्शन लाभले. तर, श्री. अनंते, महेंद्र भोये यांचे सहकार्य लाभले. हे सर्व यशस्वी विद्यार्थी पुढील आठवड्यामध्ये (ता.23) जैतापूर येथे होणार्या बिटस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच सावली परवडी, हर्षा राणे, दत्ताराम राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप तावडे, गजानन भारती, मानसी तावडे, रूंजी तावडे, दयानंद परवडी यांनी स्पर्धेला उपस्थित राहून या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे यशस्वी होण्याच्यादृष्टीने मनोधैर्य वाढविले. केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये यश संपादीत केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे विल्ये ग्रामस्थांसह पालकांकडून कौतुक केले जात आहे. केंद्रस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख सुनिल जाधव आणि केंद्रातील सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली