पाकिस्तान:- भारतात दहशतवाद (Terrorism in India) पसरवणारा पाकिस्तान आपला दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा नेहमीच इन्कार करतो, मात्र आता त्याचा खरा चेहरा उघड झाला आहे. खुद्द पाकिस्तानी लष्करानेच याचा खुलासा केला आहे. लष्कराने सांगितले की, पाकिस्तानच्या प्रत्येक गल्लीत दहशतवादी फिरत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी लष्कराला मोठी कसरत करावी लागते.
पाकिस्तानी लष्कर (Pakistan Army) या सर्व गोष्टी स्वत:च्या स्तुतीसाठी सांगत होते, परंतु या आकडेवारीने पाकिस्तान सरकारच्या दाव्यांचा धुरळा उडवला. माजी आयएसआय प्रमुख (Ex-ISI Chief) फैज हमीद यांच्याविरोधात कोर्ट मार्शलमध्ये लष्कराच्या प्रवक्त्याने अशी काही आकडेवारी दिली होती ज्यामुळे पाकिस्तान सरकारचा पर्दाफाश झाला होता.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसारनुसार, “लष्कराने सांगितले की, लष्कराला पाकिस्तानमध्ये दररोज 130 ऑपरेशन्स कराव्या लागतात. केवळ 8 महिन्यांत दहशतवाद्यां विरोधात 32,173 ऑपरेशन्स करण्यात आल्या आहेत. यापैकी गेल्या महिन्यात 4,021 ऑपरेशन्स करण्यात आल्या, ज्यामध्ये 90 दहशतवादी मारले गेले”. पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, लष्कर, गुप्तचर संस्था आणि पोलिस दररोज दहशतवाद्यांविरोधात 130 हून अधिक ऑपरेशन करत आहेत, परंतु दहशतवाद्यांची संख्या कमी होत नाही.
दहशतवाद्यांविरोधातील लष्कराच्या कारवाईत अनेक जवानही शहीद झाले आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या 8 महिन्यांत 193 जवान शहीद झाले आहेत. त्याचबरोबर दहशतवाद्यांशी लढताना शेकडो जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (Tehreek – e – Taliban Pakistan), लष्कर-ए-इस्लाम (Lashkar-e-Islam), जमात-उल-अहरारसह (Jamaat-ul-Ahraar) शेकडो दहशतवादी संघटना आहेत. त्याचवेळी बलुचिस्तानमधील (Balochistan) बंडखोर पाकिस्तानी लष्करा विरोधात शस्त्र उचलत आहेत. तेथूनही रोज हल्ले होत आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, जोपर्यंत दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत लष्कराचे हे ऑपरेशन सुरूच राहणार आहे. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी जन्माला येत आहेत, त्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे.