रत्नागिरी येथे पत्रकार आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0
38

रत्नागिरी:- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त उदय सामंत प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे मंगळवारी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पत्रकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचे आरोग्य व्यस्त जीवनशैलीमुळे बिघडत चालले आहे. कामाचा ताण, विश्रांतीचा अभाव यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारींना पत्रकारांना समोरे जावे लागत आहे. या बाबींचा विचार करुन मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत उदय सामंत प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे मंगळवारी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रत्नागिरी शहर परिसरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या पत्रकारांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. या शिबिराला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची विशेष उपस्थिती लाभली.

पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराला वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डॉ. रामा भोसले, सीएस भास्कर जगताप, डॉ. विकास कुमरे, डॉ. विनोद सांगवीकर, डॉ. मनोहर कदम, डॉ. योगेंद्र पवार, डॉ. कृणाल भोईर आणि इतर कर्मचार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उदय सामंत प्रतिष्ठानचे महेश सामंत, सागर भिंगार्डे तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here