लांजा:- शाळकरी मुली व महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुलींनी शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याच्या विकासातून निर्भयतेकडे वाटचाल करायला हवी.अशा परिस्थितीत स्व-संरक्षण करता येणे, ही काळाची गरज बनली आहे. हाच उद्देश ठेवून ग्रामीण भागातील महिला मुलींसाठी विविध उपक्रम राबविणारे कोर्ले ग्रामपंचायत चे सरपंच श्री गणेशराव जगन्नाथ साळुंके साहेब यांच्या स्वयंप्रेरणेतून लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तायकवाँदो या मार्शलआर्ट खेळातील राष्ट्रीय खेळाडू, ब्लॅक बेल्ट, राष्ट्रीय पंच, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे राज्यस्तरीय स्वयंसिध्दा प्रशिक्षण शिबिर केलेल्या प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर व तायकवाँदो फिटनेस ॲकॅडमी प्रभानवल्ली लांजा यांच्या मार्फत प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे दि. ७ ऑक्टोंबर रोजी श्री. देवी आदिष्टी प्रसारक मंडल प्रभानवल्ली शाळा क्र. १ व वेरवली पंचक्रोशी संस्था श्री राम विद्यालय वेरवली बुद्रुक या दोन्ही विद्यालयातील दीडशे ते दोनशे विद्यार्थिनींना स्व-संरक्षणचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराला कोर्ले ग्रामपंचायत सरपंच श्री गणेशराव जगन्नाथ साळुंके, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी तेजस वडवलकर, श्री. देवी आदिष्टी प्रसारक मंडल प्रभानवल्ली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मंगेश जाधव, कार्याध्यक्ष श्री. जितेंद्र ब्रीद, सदस्य शशिकांत चव्हाण, श्री. संदीप शिंदे, मुख्याध्यापिका अनिता शिंदे, सरपंच सौ. गावाखडकर मॅडम, शिक्षक पालक संघ सदस्य श्री. महेश ब्रीद, श्री. उमेश पत्की, श्री. देवेड गुरव,श्री राम विद्यालय वेरवली बुद्रुक मुख्याध्यापक श्री. अरुण बाळकृष्ण डोळे, क्रीडा शिक्षक श्री. सचिन कांबळे इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते.