चिपळूण:- चिपळूण-तालुक्यातील श्री महाकाली क्रीडा मंडळ कुंभार्ली आयोजित कुमार व कुमारी गट रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष बाबू तांबे,कार्याध्यक्ष एल.के.शिंदे,प्रशिक्षक संतोष शिंदे,सरपंच रवींद्र सकपाळ,उपसरपंच संदीप कोलगे,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, राष्ट्रवादी युवक तालुका सचिव संकेत भांडारे, राष्ट्रवादी महिला तालुका उपाध्यक्ष निशा कोलगे,राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष सुजय शिर्के,तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष प्रसाद कोलगे,जीवन घाग,श्री महाकाली नवयुग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नंदू शिंदे,उपाध्यक्ष अजित लाड,सचिव दिनेश शिंदे,ग्रामपंचायत सदस्य बाळू जाधव,अशोक गांधी, बालशेठ लांबे,शरद कोलगे, संदीप कोलगे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुरव, चंद्रकांत भांडारे, गुणवंत कर्मचारी मुन्ना कदम, दशरथ शिंदे, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू बाबू तोडणकर, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे बांदर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कुंभार्ली गावात प्रशांत यादव यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.तसेच फित कापून क्रीडांगणाचे उदघाटन झाल्यानंतर प्रशांत यादव यांच्या हस्ते दीप प्रजवलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच क्रीडांगणाचे पूजन करून महाकाली देवीला साकडे घालण्यात आले. त्यानंतर प्रशांत यादव,बाबूशेठ तांबे व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ५१ वि अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे उदघाटन पार पडले.आणि नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशांत यादव यांचा मंडळाच्या वतीने शाल,सन्माचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशांत यादव म्हणाले की…
“कोकणची भावी पिढी घडवण्यासाठी आपण सर्वजण जे योगदान देत आहात त्यासाठी तुमचे कौतुक करावे तितके कमी आहे.कोकण हे कबड्डीचे माहेरघर आहे.येथून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना माझे सर्वतोपरी सहकार्य असेल.तरुणांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय मी घेतला असून आपण कधीही हाक मारा धावून आल्याशिवाय राहणार नाही.अशी ग्वाही त्यांनी खेळाडूंना व येथील मंडळाच्या सदस्यांना दिली.