पद स्वीकारताच झालेल्या आरोपांबद्दल व्यक्त केली खंत; पुन्हा सामाजिक चळवळीकडे वळणार!
रत्नागिरी:- वरवडे येथील शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नुकतेच रत्नागिरीचे उप तालुकाप्रमुख पद स्वीकारलेले श्री. प्रथमेश गावणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी तसा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ते म्हणाले. ‘सर्वप्रथम माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आजपर्यंत जे प्रेम त्यांनी माझ्यावरती दाखवलं त्या प्रेमापोटी आज हे सगळे सहकारी आपल्या व्यक्तिगत आयुष्यातली सगळी कामे बाजूला सोडून आज माझ्या समवेत आली आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मला काही गोष्टी लोकांसमोर मांडाव्याशा वाटतात, त्यापैकी पहिला मुद्दा असा की गेले चार ते पाच वर्षाहून अधिक काळ मी सामाजिक आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये काम करतोय आणि हे काम करत असताना ते कुठल्याही व्यक्तिगत जाती समूहासाठी नव्हतं तर सर्व जातीसमूहासाठी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये माझा एक सहकारी वर्ग तयार झाला आहे. हे सगळं चालू असताना जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून जिजाऊ संस्थेचे काम आम्ही सगळ्यांनी चालू केलं आणि अगदीच मोजक्या सहा ते आठ महिन्यांमध्ये हे जिजाऊ संस्थेचं वारं आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये निर्माण केलं. हे काम करत असताना लोकांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला की एक चांगली सामाजिक यंत्रणा तालुक्यामध्ये उभी राहते मग ती शिक्षण क्षेत्रामध्ये असेल आरोग्य क्षेत्रामध्ये असेल राजकीय लोक राजकीय काम करत आहेतच पण पर्यायाने ज्या गोष्टींची लोकांना गरज आहे ते काम या तालुक्यामध्ये उभे राहत होते.’
ते पुढे म्हणाले, ‘हे सगळं करत असताना विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि मग एक विचार यायला लागला की ज्या पद्धतीने आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलंय त्याच पद्धतीने जर आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करू शकलो तर आपल्या सहकाऱ्यांना, जे वर्षानुवर्ष प्रस्थापित पक्षांपासून वंचित आहेत त्या सगळ्या सहकाऱ्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने न्याय देऊ शकतो हा विचार जसा मनामध्ये आला तसा तो विचार मी माझ्या आयुष्यात जे जे महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो, माझी आई, माझ्या कुटुंबातील सदस्य, माझे इतर सहकारी मित्र, सामाजिक क्षेत्रात असलेले माझे सगळे सहकारी असतील यांच्या समवेत बोलून मी हा विचार त्यांना सांगितला आणि सातत्यपूर्ण चर्चा केल्यानंतर सगळ्यांनी असं एक मत व्यक्त केलं की तुला जर असा विश्वास वाटत असेल की तू यामध्ये यशस्वी होऊ शकतोस तर निश्चित प्रमाणे आमचं कुठलंही मत नसेल तू त्या पद्धतीने वाटचाल करायला हरकत नाही आणि मग त्या पद्धतीने समोर एक अजेंडा ठेवून सन्माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या समवेत साधक-बाधक चर्चा करून आपण आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
‘मला आजही गोष्ट विश्वासाने सांगावीशी वाटते की सन्माननीय उदय जी सामंत साहेबांनी मी ज्या ज्या वेळेला त्यांना अॅप्रोच होण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला त्यांनी सन्मानाने वागणूक दिली, अतिशय चांगल्या पद्धतीचं बॉण्डींग त्यांच्या समवेत आजही आहे. महत्त्वाचा मुद्दा हा निर्णय मी 29 ऑक्टोबर रोजी घेतला, सगळ्यात खंत या गोष्टीची वाटते की कोणताही राजकीय वारसा नसलेला एक तरुण कोणताही राजकीय पाठिंबा नसताना या राजकीय प्रक्रियेत जेव्हा एखादा सर्वसामान्य कुटुंबातील तरुण पुढे येतो तेव्हा त्याला आधार देण्याऐवजी ज्या पद्धतीने टीका टिप्पणी झाली त्याचा मनाला प्रचंड खेद वाटतो. साधारणता जेव्हा 29 ऑक्टोबरला हा प्रवास चालू झाला त्यावेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल व्यक्तिगत रित्या असतील किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्यक्तिगत रित्या असतील किंवा इतर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रथमेश किती चुकीचा हेच मांडण्याचे सातत्याने प्रयत्न झाले. वाईट त्या गोष्टीचं वाटलं नाही कारण जेव्हा पण मी हा निर्णय घेतला तेव्हा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला होता. त्यांना कदापि असं माझ्याबद्दल अविश्वास नव्हता किंबहुना माझ्या एकंदरीत आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये माझ्या जी आई वडिलांनी मला शिकवण दिली त्या शिकवणी वरती पुढे चालत माझ्यामुळे कोणताही माणूस दुःखी होणार नाही याची खात्री खबरदारी मी आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी घेत आलो, किंबहुना माझ्यामुळे प्रत्येकाला फायदा होईल हाच विचार सातत्याने केला आणि हे सगळे एक बाजू असताना देखील जेव्हा दुसऱ्या बाजूला प्रथमेश कोणत्यातरी आर्थिक अमिषा पोटी हा राजकीय निर्णय घेतोय किंवा कुठल्यातरी आर्थिक लालसे पोटी घेतोय तेव्हा मात्र मनाला प्रचंड दुःख होत होतं.
जेव्हा या सगळ्या गोष्टी माझ्या कुटुंबापर्यंत यायला लागल्या आणि जेव्हा माझ्या कुटुंबातील सदस्यांवरती शिंतोडे उडवायला सुरुवात झाली तेव्हा खरंच मनाला वेदना होत होत्या आणि या वेदना देखील मी माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून दाखवल्या त्यावेळेला सगळ्या सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की साधारणतः ह्या सगळ्या प्रवासात तुला वाटतं म्हणून आम्ही तुला साथ दिली व्यक्तीगत तुझा राजकारणात जाणे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही याचं कारण इथून पुढे अशा पद्धतीची सामाजिक चळवळच उभी राहणार नाही. कारण सर्वसामान्य लोकं ही फार अगदी साध्या मनाची असतात त्यांना असं वाटतं की एखादा प्रवाहामध्ये एखादा माणूस चालत असेल तर त्याने त्याच प्रवाहामध्ये चाललं पाहिजे. तेव्हा जेव्हा टर्न घेतो त्यावेळेला ते तेवढ्या पद्धतीने समजून घेत नाहीत आणि अनेक मोठ्या प्रमाणात जो सुशिक्षित वर्ग माझ्या समवेत होता त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर मला सातत्याने पाहायला मिळत होता हे सगळं चालू असताना ज्या पद्धतीने टीका टिपणी होत होती तेव्हा मनाला कुठेतरी असं वाटलं की आपण नक्की मग कशासाठी हा निर्णय घेतला.
हे करून जर आपल्या सहकाऱ्यांना देखील न्याय मिळवून देणार नसू किंवा आपल्यामुळे आपल्या सहकाऱ्यांवर देखील शिंतोडे उडवले जाणार असतील तर आपण या राजकारणात नसलेले चालेल. आपण एक सर्वसामान्य माणूस म्हणून घरात बसलेलं मला कधीही आवडेल आणि ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत आज सगळ्यांना बोलावून त्यांच्यासमोर ठेवल्या आणि त्यांना मी असं सांगितलं की या सगळ्यांमध्ये तुमचा निर्णय हा व्यक्तिगत तुम्ही घेऊ शकता पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो काही मी राजकीय प्रवास करण्याचा निर्णय घेतलाय तो कुठेतरी थांबवला पाहिजे, तो थांबवला एवढ्यासाठीच पाहिजे की भविष्यामध्ये अशा पद्धतीची सामाजिक, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातली चळवळच उभी राहू शकत नाही. लोकं पुन्हा ह्या चळवळीवरती कधी विश्वास ठेवणार नाहीत. माझे वाईट झालेले चालेल पण कुठेतरी चळवळ आपल्यामुळे थांबत असेल तर निश्चित प्रमाणे आपण दोन पावलं मागे आले पाहिजे, त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी ज्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला त्या राजकीय पक्षाचा आणि त्या राजकीय पक्षातून मिळालेल्या पदाचा आज सर्वांसमोर मी जाहीर राजीनामा देत आहे, माझ्या पक्षश्रेष्ठींकडे तो राजीनामा मी लिखित स्वरूपात पाठवणार आहे, तूर्तास आज रोजी मी हा राजकीय प्रवासात थांबण्याचा निर्णय घेतोय. येणाऱ्या काळात जी काही राजकीय वाटचाल असेल किंवा सामाजिक वाटचाल असेल की माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा एकदा तालुक्यामध्ये जे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत मी बसेन आणि ते ठरवतील तो निर्णय घेणार आहे.
‘सगळ्या प्रवासामध्ये आज आपण जे काही नाव तयार केलं मागच्या चार-पाच वर्षांमध्ये ते मला छोटं असेल पण ते माझं स्वतःचं होतं आणि ती आयडेंटिटी लपावी असं मला आज रोजी अजिबात वाटत नाही. आज रोजी माझे प्राधान्य माझं नाव जपणे, माझ्यावर ठेवलेला विश्वास जपणे, जे काही सहकारी माझ्या समवेत आलेत त्यांचा विश्वास जपणं हीच माझ्यासाठी सगळ्यात पहिली प्रायोरिटी वाटते, आणि म्हणून तूर्तास हा राजकीय प्रवास आज रोजी मी थांबवत असल्याचे श्री. गावणकर यांनी सांगितले.’ येणाऱ्या काळामध्ये भले मला जरी सामाजिक क्षेत्रात काम करायचं असं मला वाटत असलं तरी त्यासाठी मला कोणत्याही पदाची गरज नाही, कारण आज पर्यंत कुठल्याही पदाच्या लालसेपोटी मी कुठलेही काम केलेलं नाही, जे काही काम आहे ते ताकदीने, आपल्या स्वतःच्या हिमती वर करण्याचा प्रयत्न केला आहे. कायमच मी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये देखील ह्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्या ताकतीने काम करण्याचा प्रयत्न करेल आणि इथून पुढे जी काही वाटचाल असेल ती पूर्णपणे सामाजिक क्षेत्रातलीच वाटचाल असेल. तूर्तास राजकीय प्रवास या ठिकाणी थांबवतोय, या सगळ्या प्रवासामध्ये जे जे पक्षातले अनेक मान्यवर मंडळी होती त्यांनी मला जे काही सहकार्य केलं, मला समजून घेतलं त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो, हा निर्णय घेत असताना कदाचित त्यांना हा निर्णय आवडणारा नाहीये तरीपण मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले.
‘शेवटी मला माझ्या मनाला जर समाधान त्या ठिकाणी मिळणार नसेल तर निश्चित प्रमाणे थांबले पाहिजे, हेच मला आज रोजी योग्य वाटतं. आज माझे सगळे सहकारी माझ्या समवेत आहेत हीच माझी खरी ताकद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ताकदी सोबत पुढे जाण्याचा निश्चित प्रमाणे प्रयत्न करेन. येणाऱ्या काळामध्ये मात्र अशा पद्धतीचे निर्णय घेताना व्यवस्थित विचार केला जाईल. सन्माननीय सांबरे साहेबांची देखील मनापासून त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या ह्या निर्णयामुळे जिजाऊ संस्थेवरती देखील ज्या पद्धतीने शिंतोडे उडवले गेलेत त्याबद्दल मनापासून माफी मागतो,’ असे जिजाऊ संस्थेचे तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष राहिलेल्या प्रथमेश गावणकर यांनी सांगितले.