सहकारनगर येथील गळती लागलेल्या टाकीबाबत 24 तासात निर्णय न झाल्यास टाकीवर चढून आंदोलन करणार. :- भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत.

0
37

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये असणारी पाण्याची टाकी या टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने याचा परिणाम आजूबाजूच्या प्रभाग क्रमांक पाच व सहा मधील पाणी पुरवठयावर होऊ लागला आहे. काल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या टाकीची पाहणी करून तेथील परिस्थिती पाहिली व आजूबाजूच्या नागरिकांशी संवाद देखील साधला. व याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निलेश आखाडे, शैलेश बेर्डे,नितीन गांगण यांनी तेथील स्थानिकांना सांगितले.

आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी रत्नागिरी नगर परिषदेला धडकले. व तेथील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या टाकीबाबत 24 तासाच्या आत ठोस निर्णय न झाल्यास नगरपालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना न केल्यास या टाकीवर चढून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आंदोलन करतील असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, दादा ढेकणे, प्रभाग क्रमांक पाच आणि सहा मधील निलेश आखाडे, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, सौ दळी, संदीप सुर्वे, राधा हेळेकर, महिला अध्यक्ष पल्लवीताई पाटील, मंदार मयेकर, मंदार खंडकर, अमित विलणकर, आदि. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here