रत्नागिरी:- (असलम शेख, रत्नागिरी) काँग्रेस भवन येथे आज सायंकाळी झालेल्या महाविकास आघाडी बैठकिमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकी मध्ये महायुतीने ईव्हीएम मशीन द्वारे एकतर्फी विजय मिळवून जनतेची दिशाभूल केली त्यासंर्भात शुक्रवार दि.06/12/2024 रोजी ईव्हीएम हटाव देश बचाव ही मोहीम डोळ्यासमोर ठेऊन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्या तयारी करिता आज सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी माजी खासदार श्री. विनायक राऊत, काँग्रेस नेते सहदेव बेटकर साहेब,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री. बारक्या शेठ बने, काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष श्री. अशोक जाधव, शिवसेना उभाठा गटाचे जिल्हाध्यक्ष श्री.विलास चाळके, जेष्ठ नेते श्री. तात्या सरवणकर, काँग्रेस प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष श्री. दीपक राऊत, श्री काका तोडणकर, श्री. बी. के. पालकर, श्री दीपक निवाते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.