शिवसृष्टीतील पुतळे तोडणारा ‘दारुडा’?

0
55
Maruti Mandir, Shivsrushti, Ratnagiri.
काल रात्री रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल येथील शिवसृष्टी मधील पुतळ्यांचे कोणीतरी अज्ञाताने तोडण्याच्या प्रकारानंतर रत्नागिरीत एकच खळबळ उडाली आहे.

नमस्कार करून तोडले पुतळे!

रत्नागिरी:- काल रात्री रत्नागिरी शहरातील (Ratnagiri City) शिवसृष्टी मध्ये असलेल्या पुतळ्यांचे कोणीतरी अज्ञाताने तोडण्याचा प्रकार घडल्यामुळे रत्नागिरीत (Ratnagiri) एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांना सीसीटीव्हीच्या आधारे काल रात्री संदेश गावडे (वय-२४) नामक व्यक्ती सापडली असून त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. आणि त्याला न्यायालयात हजर देखील केले आहे.

दरम्यान शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मारुती मंदिर (Maruti Mandir, Ratnagiri) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) असून त्यांच्या आजूबाजूला शिवसृष्टी म्हणून मावळ्यांचे पुतळे ही ठेवण्यात आलेले आहेत. या संदर्भात त्या व्यक्तीने सीसीटीव्हीच्या मध्ये पाहिल्यावर असे दिसते की आधी नमस्कार केला आणि नंतर कुठल्यातरी दांडका वजा हत्याराने त्या पुतळ्यांची विटंबना करत कोणा मावळ्याचे हात तर कोणाचा पाय तोडल्याचा प्रकार घडल्याचे दिसते आहे.

घडलेल्या घटनेबाबत नागरिक संतप्त झाले असून अशा प्रकारे जरी दारू पिणारा असेल तरी त्याने या गोष्टी करायला नको हव्या होत्या अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here