राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत युवा क्लबने केली पदकांची लयलूट!

0
39

६ सुवर्ण, २ रौप्य, ७ कांस्यपदक ; रत्नागिरी जिल्ह्याचा संघ उपविजेता.

रत्नागिरी:- तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा यांच्यावतीने आयोजित जळगाव तायक्वांदो असोसिएशन संयोजित छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे दहावी राज्यस्तरीय तायक्वांदो फाईट व पुमसे स्पर्धेत युवा क्लबच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. या स्पर्धेत आपल्या चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करत खेळाडूंनी ६ सुवर्ण, २ रौप्य, ७ कांस्य पदकांची कमाई केली. स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचा संघ उपविजेता ठरला.

रत्नागिरी शहरातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप शाखा ओम साई मित्र मंडळ सभागृह कै. अन्नपूर्णा संगीत कला विद्यालयमध्ये प्रशिक्षण घेणारे तायक्वांदो खेळाडूंनी या राज्य स्पर्धेत क्योरुग व पूमसे प्रकारात ६ सुवर्णपदक, २ रौप्य पदक, तर ७ कांस्य पटकावून रत्नागिरी जिल्ह्याचा संघ उप विजेता ठरला.

स्पर्धेतील विजेते खेळाडूंची नावे

सुवर्ण पदक प्राप्त- मंथन आंबेकर, सार्थक गमरे, अस्मि साळुंखे, ओवी काळे, रुही कररा, आराध्य तहसीलदार. रौप्य पदक प्राप्त- देवांश गराटे, मंथन आंबेकर. कांस्य पदक प्राप्त– सोनाक्षी रहाटे, उत्कर्ष शेट्ये, अरहा आयरे, अस्मि साळुंखे, सार्थक गमरे, आराध्य तहसीलदार, ओवी काळे. या सर्वांनी १५ पदके पटकावली. या स्पर्धेचे संघाचे प्रशिक्षक म्हणून ब्लॅक बेल्ट थर्ड डॉन अमित रेवत कुमार जाधव व महिला प्रशिक्षिका सौ. शशिरेखा कररा यांनी यशस्वीरित्या काम पाहिले.

सर्व विजेत्या खेळाडूंना रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार विजेते व्यंकटेश्वर कररा, उपाध्यक्ष (पीआय) शैलेश गायकवाड, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, खजिनदार आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शशांक घडशी, तसेच ओम साई मित्र मंडळाचे पदाधिकारी, कै.अन्नपूर्णा संगीत कला विद्यालयचे अध्यक्ष अनंत आगाशे, ॲड. प्रिया लोवलेकर, श्री साई सेवा मित्र मंडळ नाचणे गोडाऊन चे अध्यक्ष संतोष सावंत, युवा उद्योजक गौरांग आगाशे, सौ. दीप्ती आगाशे, युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे मुख्य प्रशिक्षक राम कररा यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here