रिंगणे (लांजा):- बदलत्या काळा नुसार स्वतःचे संरक्षण कसे करावे, आपल्यावर संकट आल्यास आपण कसे सक्षम असावे, आपला बचाव कसा करावा याबाबत मुलींना माहिती मिळावी या साठी लांजा तालुक्यातील रिंगणे येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, रिंगणे विद्यालयातील मुलींना स्व:संरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण लांजा तालुक्यातील तायकवाँदो या मार्शलआर्ट खेळातील राष्ट्रीय खेळाडू ,ब्लॅक बेल्ट, राष्ट्रीय पंच,क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे राज्यस्तरीय स्वयंसिध्दा प्रशिक्षण शिबिर केलेल्या प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर व तायकवाँदो फिटनेस ॲकॅडमी प्रभानवल्ली लांजा यांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिक दाखवून मुलींना माहिती दिली.

स्व:संरक्षण प्रशिक्षण हे ग्रामीण भागातील मुलींना मिळावे व त्याही बदलत्या काळा नुसार सक्षम व्हाव्या, तसेच नेहमीच ग्रामीण भागातील महिला मुलींसाठी विविध उपक्रम राबविणारे कोर्ले ग्रामपंचायत चे सरपंच श्री गणेशराव जगन्नाथ साळुंके साहेब यांच्या स्वयंप्रेरणेतून लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
तसेच या प्रशिक्षण शिबिरला 80 ते 90 मुली उपस्थित होत्या.

या प्रशिक्षणला सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर रिंगणेचे प्राचार्य श्री बी एस पाटील सर, रिंगणे सरपंच श्री संजय आयरे , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे राज्यस्तरीय स्वयंसिध्दा प्रशिक्षण शिबिर केलेल्या प्रशिक्षिका व तायक्वाँदो ब्लॅक बेल्ट शितल विरेंद्र आचरेकर, तायक्वाँदो फिटनेस ॲकॅडमी प्रभानवल्ली लांजा चे मार्गदर्शक तेजस वडवलकर, कोषाध्यक्ष तेजस पावसकर ,रिंगणे तंटामुक्ती अध्यक्ष श्री विकास आयरे,श्री दिपक आयरे सर ,श्री संतोष कांबळे सर, श्री गुरव सर, सुत्र संचालन श्री सुर्वे सर यांनी केले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
