साखरपा:- प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय साखरपा मधील विद्यार्थी विनायक भोसले याला मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त झाले. दि. 9 डिसेंबर 2024 रोजी S.H. Mutha कॉलेज कल्याण येथे झालेल्या मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन ( one zone basis) कुस्ती स्पर्धा 2024 -25 पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी विनायक भोसले हा 92 किलो वजनी गटातून खेळला असता यावर्षी देखील त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
विनायक भोसले हा निळे भोसलेवाडी ता. शाहुवाडी येथील असून सध्या तो राशिवडे कोल्हापूर येथे हनुमान कुस्ती संकुल मध्ये सागर चौगुले यांच्या तालमीत सुट्टीच्या दिवशी कुस्तीचे धडे गिरवत आहे. जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुरज लिंगायत यांच्या मार्गदर्शना खाली तो सदर स्पर्धेस पात्र ठरला. संस्थेचे संस्थापक प्रा. आबा सावंत , संचालिका गीतांजली सावंत, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या शिल्पा वैद्य , प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विनायकच्या यशाबद्दल आभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विनायक भोसले च्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .