दापोली:- दिनांक 26 डिसेंबर, 2024 रोजी ए.जी.हायस्कूल दापोली येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मा.प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी दापोली शिक्षण संस्थेचे गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर, संचालिका सौ.स्मिता सुर्वे मॅडम, माजी संचालक श्री.प्रसाद फाटक, माजी संचालिका सौ.नीलिमा देशमुख मॅडम, तसेच मुख्याध्यापक एस.एम.कांबळे, उपमुख्याध्यापक डी .एम.खटावकर, पर्यवेक्षिका सौ. मोहिनी खटावकर, ज्येष्ठ शिक्षक श्री.नितीन मुंडेकर तसेच शिक्षक प्रतिनिधी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विविध प्रदर्शनांचे उद्घाटन करण्यात आले.

त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन, रंगावली प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, पुष्परचना प्रदर्शन, भूगोल प्रदर्शन आणि वाणिज्य प्रदर्शन इत्यादी प्रदर्शने शिक्षक ,विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी खुले करण्यात आले. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थाचालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, ज्येष्ठ शिक्षक, शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलन 2024 चे खास आकर्षण बुद्धिबळ विश्वविजेता डोम्माराजू गुकेश याचे भव्य वूड पेंटिंग अकरावी सायन्सचा विद्यार्थी कुमार विभव विश्वास गोंधळेकर याने रेखाटले आहे. त्याने रेखाटलेल्या पेंटिंगचे माननीय प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले साहेब तसेच संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी भरभरून कौतुक केले.
