संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड ग्रामपंचतीतर्फे वनराई बंधारे बांधण्यात आले. सरपंच सौ. नम्रता कवळकर यांनी श्रमदानात सहभागी होत बंधाऱ्याचे काम करीत त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्यासोबत उपसरपंच रविंद्र पवार यांनीदेखिल मेहनत घेतली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ चा नारा देत गावात दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. याकामी अंगणवाडी सेविका, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, योजना दूत, ऑपरेटर यांनी मेहनत घेतली.