१७ डिसेंबरला सेवानिवृत्तांचा रत्नागिरीत मेळावा.

0
30

रत्नागिरी:- निवृत्तीवेतन हा निवृत्ती वेतनधारकांचा घटनादत्त अधिकार आहे. असा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने १७ डिसेंबर १९८२ ला दिला. या निर्णयाची आठवण सदैव राहावी म्हणून तसेच निवृत्ती वेतनधारकांचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांचा ‘निवृत्ती वेतनधारक दिवस’ म्हणजेच ‘पेन्शनर डे’ निमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन येत्या १७ डिसेंबरला येथील गुरूकृपा मंगल कार्यालय, पऱ्याची आळी येथे दुपारी अडीच वाजता आयोजित करण्यात आला आहे.

विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा सभासद उभयतांचा विवाह सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. निवृत्ती वेतनधारक सभासदांच्या विवाहास ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा सभासदांनी सेजस कार्यालयाशी किंवा कार्यकारी सदस्यांशी संपर्क साधून १३ डिसेंबरपर्यंत फॉर्म भरावयाचा आहे. उभयतांपैकी एक व्यक्ती सेजसची सभासद असणे आवश्यक आहे. सेजस कार्यालय दर मंगळवार व शुक्रवार सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत उघडे असते. या वेळात सभासदांनी संपर्क साधावा, असे आवाहन सेजसचे अध्यक्ष वसंत झगडे व कार्यकारी मंडळाने केले आहे तसेच निवृत्ती वेतनधारक सभासद ५ हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देतील. त्यांचाही या मेळाव्यात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येईल. तरी सभासदांनी देणगी स्वरूपात आर्थिक सहकार्य सेवानिवृत्तांची जनसेवा समितीला करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here