संगमेश्वर:- शिवने ता. संगमेश्वर येथील पुरातन उजव्या सोंडेच्या दोन मुर्ती असलेल्या श्री सिद्धिविनायक हरिहरेश्वर मंदिरात आमदार श्री शेखर निकम यांना मंत्री पद मिळण्यासाठी श्री निकम यांच्या कार्यकर्त्यांकडून अभिषेक करण्यात आला.
यासाठी वेदमूर्ती श्री माधवराव जोशी , जयंत जोशी, यांच्या सह सुभाष पाचकळे, मारुती पवार, अमोल रसाळ, चंद्रकांत गेल्ये, सुधीर हळबे, शशिकांत रसाळ, सिध्येश शिंदे, चंद्रकांत घोगले, स्वप्नील गुरव , नाना हळबे यांचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यानिमित्ताने महाप्रसाद ठेवण्यात आला होता. श्री सिद्धिविनायक नक्की च श्री निकम यांना यश देईल अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.