रत्नागिरी:- भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या रत्नागिरी दौऱ्या दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. भाजपचे युवा नेते डॉ. ऋषिकेश केळकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात ऊर्जा खात्याअंतर्गत निर्माण करता येतील अशा नावीन्यपूर्ण ऊर्जा प्रकल्पांसंदर्भात मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. श्रीपाद नाईक यांनी डॉ. केळकर यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी माजी आमदार बाळ माने, ज्येष्ठ नेते ऍड. बाबा परूळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.