सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यात झाला अपघात.
गंगटोक:- सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यात हा अपघात झाला. यामध्ये ४ जवान शहीद झाले आहेत. सैनिकांना घेऊन जाताना या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती आहे. पाकयोंग जिल्ह्यातील रेशीम मार्गावरून लष्कराचे वाहन झुलुक येथे जात होते. या दुर्घटनेत ४ जवानांचा मृत्यू झाला आहे.
लष्कराचे वाहन पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यातील रेशीम मार्गावरील झुलुककडे जात असताना हा अपघात झाला. लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरले खोल दरीत पडले. रेनॉक रोंगली महामार्गाजवळ असलेल्या दलोपचंद दराजवळील वर्टिकल वीर येथे हा अपघात झाला, जो रेशीम मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.
सर्व सैनिक पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील एनरूट मिशन कमांड युनिटचे होते. दलोपचंद दराजवळील वर्टिकल वीर येथे हा अपघात झाला. हे रेनॉक रोंगली हायवे जवळ जो रेशीम मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरले आणि 700 ते 800 फूट खाली खड्ड्यात पडले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि लष्कराचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. वाहन दरीत पडण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही
न्यूजमंत्रा