लांजा तालुक्यातील पुनस येथील वयोवृद्ध महिलेची आत्महत्या!

0
69

लांजा:- सततच्या आजाराला कंटाळून एका ७० वर्षीय महिलेने घराच्या पडवीत साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पुनस वरचीवाडी येथे घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पुनस वरचीवाडी येथे राहणारी ताई गोपाळ चापडे (७० वर्षे) ही गेल्या काही वर्षांपासुन आजाराने त्रस्त होती. सततच्या आजाराने त्रस्त झाल्याने गुरुवारी १८ सष्टेंबर रोजी रात्री राहत्या घराच्या मागील बाजूच्या पडवीमध्ये लोखंडी अँगलला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना घरातील मंडळींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिस पाटील यांना दिली. पोलीस पाटील यांनी याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. नासिर नावळेकर हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here