रत्नागिरी:- मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी निमित्त वाकड, पुणे येथील श्री श्री 1008 प. पू. स्वामी अवधूतानंद जी हे श्री हनुमान कथा प्रसंग आणि सत्संग प्रवचन देणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेत शहरातील बाजारपेठ येथील विठ्ठल मंदिर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन प्रमोद रेडीज, राजेंद्र फाळके, संतोष कामत आणि दीपक रहाटे यांनी केले आहे.