रत्नागिरी (जिमाका):- केंद्र पुरस्कृत उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हास्तरीय उल्लास मेळावा 17 डिसेंबर 2024 रोजी येथील मिस्त्री हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साक्षरतेच्या प्रसारासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य, व्हिडीओ यांच्या आधार स्टॉल मांडणी यासारखे विविध कार्यक्रम होणार आहेत.
सन 2023-24 मध्ये राज्यस्तरावर 5 लाख 77 हजार 337 असाक्षर नोंदणी व 8 लाख 4 हजार 99 इतके FLNAT परीक्षेस बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. जिल्ह्यामध्ये 13 हजार 505 उद्दिष्ट असून 15 हजार 547 नोंदणी झाली आहे. सन 2024-25 साठी 9 हजार 337 उद्दिष्ट तर 6 हजार 581 नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. किरण लोहार यांनी दिली आहे.