मुंबई:- लाल रंगाच्या कारने मन भरले, आता चला ती निळ्या रंगाची करु… तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. तुमच्या इच्छेनुसार कारचा रंग बदलल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. वास्तविक, भारतात वाहनांबाबत असे अनेक नियम आहेत ज्यांची बहुतेक लोकांना माहिती नाही, जर तुम्ही या नियमांचे जाणूनबुजून किंवा नकळत उल्लंघन केले, तर तुमच्या कडून दंड आकारला जाऊ शकतो. वाहनांचा रंग बदलण्यासाठी तुम्हाला त्याची आरटीओमध्ये अधिकृत नोंदणी करावी लागेल. जर तुम्ही ते कायदेशीररित्या पूर्ण केले नाही आणि वाहनाचे स्वरूप बदलले, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
याशिवाय, जर तुम्हाला कारचा रंग बदलायचा असेल, तर तुम्ही यासाठी परवानगी कशी घेऊ शकता याची प्रक्रिया देखील खाली स्पष्ट केली आहे. कारचा रंग बदलण्यात काही नुकसान नाही, तुम्ही कधीही करू शकता. मात्र रंग बदलण्यापूर्वी त्याची आरटीओकडे नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्या आरसी बुकमध्ये गाडीचा रंग बदलल्याचेही नमूद करावे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले आणि तुमच्या इच्छेनुसार रंग बदलला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. पोलिसांच्या तपासणीत ही बाब कधी निदर्शनास आली, तर हजारोंचा दंड होऊ शकतो. एवढेच नाही तर तुमची कारही जप्त केली जाऊ शकते.
जर तुम्ही कारमध्ये कोणतेही बदल करत असाल, तर या गोष्टींचे पालन करावे लागेल. जर तुमच्या बदलामुळे कारचे अधिकृत स्वरूप पूर्णपणे बदलत असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरातील आरटीओ कार्यालयात जावे लागेल. या बदलासाठी तुम्हाला काही शुल्क देखील भरावे लागेल. याशिवाय कारच्या आरसीमध्ये हा बदल नमूद करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमच्या कारचा रंग बदलू शकता.