जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची पक्षातून हकालपट्टी करा; शिवसेना (ठाकरे गट) लांजा तालुका कार्यकर्ता मेळाव्यात ठराव!

0
74

राजापूर:- विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्हा पदाधिकाऱ्यानी प्रचारामध्ये ज्या पद्धतीने सहभाग घ्यायला पाहिजे होता तो दिसला नाही तसेच निवडणूक काळामध्ये जिल्हाप्रमुख भूमिका संशयास्पद असल्याने जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची पक्षातून हकालपट्टी करा, असा ठराव लांजा तालुका शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर माजी आमदार राजन साळवी हे लांजा मध्ये पहिल्यांदाच आले होते त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी परभावर आपली मतं व्यक्त करताना जिल्हाप्रमुख यांच्या हकालपट्टीचा ठराव मांडला आहे. यावेळी माजी आमदार राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश रजापकर, तालुका प्रमुख संदीप दळवी, शहर प्रमुख नागेश कुरूप, चंद्रकांत मणचेकर, रवींद्र डोळस, संजू साळवी, परवेश घारे, आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त करताना, निवडणुकीतील निकाल हा धक्कादायक असून या निकालावर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास नाही, प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलेले आहे, त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका. एका बाजूला पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला तर दुसऱ्या बाजूला ईव्हीएम घोटाळ्यामुळे या मतदारसंघात आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजन साळवी म्हणाले की मी ४० वर्ष शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे, त्या बालेकिल्ल्यात पक्षाचा पराभव जिव्हारी लागला आहे. मी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता असून मरेपर्यंत निष्ठावंतच राहणार आहे, कार्यकर्त्यांनी कोणतीही काळजी करायची नाही, राजन साळवी सदैव आपल्या सोबत राहणार, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. पराभवानंतर पार पडलेल्या या कार्यकर्ता मेळाव्याला लांजा तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here