गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांच्यामुळे आम्ही घर साकारले!

0
80

च्यारी कुटुंबीयांनी व्यक्त केल्या भावना!

नगरगाव :- सत्तरीची जनता म्हणजे राणे यांचे कुटुंबीयच. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे (Goa Ex C.M Pratpsingh Rane) यांनी बरीच वर्षे सत्तरीचे प्रतिनिधित्व केले. पुढे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनसेवेचे व्रत विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Goa’s Health Minister Vishwajeet Rane) व आमदार डॉ. दिव्या राणे हे सध्या सत्तरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. विविध व्यासपीठावरून त्यांनी सतरीची जनता म्हणजे आपले कुटुंबीय असल्याचे वक्तव्य केले आहे.

पण, हे वक्तव्य त्यांनी व्यासपीठापुरते मर्यादित न ठेवता आपल्या कृतीतून प्रत्यक्षात उतरविले आहे. सत्तरीतील तमाम गरजवंत व गरीब कुटुंबांना नेहमीच आपल्या मदतीचा हात देऊन आपले वक्तव्य खरे केले आहे. आंबेडे नगरगाव येथील ज्ञानेश्वर शंकर चारी यांचे घर मागील वर्षीच्या पावसात कोसळले होते. आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने घर बांधण्यास जमले नाही. त्यामुळे ते झोपडी बांधून राहत होते. मुलांचे शिक्षण यांचा भार त्यांना पेलवत नव्हता. त्यामुळे नूतन घराचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले होते.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे (Dr. Divya Rane) यांच्यापर्यंत त्यांची ही व्यथा पोहोचली व त्यांनी मदतकार्य केले व ज्ञानेश्वर च्यारी यांना चिरेबंदी घर पूर्णत्वास गेल्याबद्दल च्यारी कुटुंबीयांनी राणे कुटुंबीयांना धन्यवाद दिले. नुकताच त्यांच्या भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीला गृहप्रवेश केला. नवीन घरात गणपतीचे पूजनही केले. राणे कुटुंबीयांसाठी गणरायाच्या चरणी उदंड आयुष्य, आरोग्याची प्रार्थना च्यारी कुटुंबीयांनी केली.

”अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा ! पुनरागमनाय च ! सत्तरीची जनता म्हणजे आमचे कुटुंबच आहे आणि त्यांच्या सुख- दुःखात आम्ही नेहमीच सहभागी होत राहणार. सर्वसामान्यांची सेवा, गरजवंतांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे. यापुढे आम्ही सत्तरीच्या जनतेसोबत राहू. लोकसेवा करण्याच्या आमच्या कर्तव्यात कसल्याही प्रकारची कसूर ठेवणार नाही. ”

डॉ. दिव्या राणे, आमदार, पर्ये मतदारसंघ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here