रत्नागिरी करांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन.
रत्नागिरी:- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात खास रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे शिबिर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण पंधरा दिवसांचा असून हे शिबिर १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान दररोज सायं ०५ वाजता होणार आहे.
मोफत शिबिर असल्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली एक प्रकारे या शिबिरातून रत्नागिरी करांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे जराही वेळ न दवडता इच्छुक नागरिकांनी दिलेल्या लिंक वर https://forms.gle/asQ7baBQMbUtju9t9. क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करावी तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.