कोतवडे:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय झडपोली यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते २ वाजे दरम्यान श्री हरीचंद्र शेठ धावडे यांच्या निवासस्थानी कोतवडे येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरामध्ये नेत्र तपासणी, रक्तदाब व जनरल तपासणी, शुगर तपासणी, मोफत औषधे वाटप आणि विविध शस्त्रक्रिया जसे की मोतीबिंदू, मुतखडा, हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स इत्यादींची मोफत सेवा प्रदान करण्यात आली. ३८० रुग्णांची नोंद करण्यात आली, त्यात ६६ रुग्णांची मोतीबिंदू तपासणी केली गेली आणि २६३ लोकांना मोफत चष्मे वितरित केले गेले. आवश्यक रुग्णांना संस्थेच्या हॉस्पिटलमधून मोफत ऑपरेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
शिबिराच्या उद्घाटनास उपस्थित मान्यवरांनी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली. यावेळी उपस्थित राहिलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये आंबा व्यावसायिक श्री हरीचंद्र शेठ धावडे, जिजाऊ रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अँड महेंद्र वसंत मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार अनंत नैकर, रमेश मांडवकर, विश्वास बारगुडे, प्रशांत सनगरे, नागेश ठीक, सुहास शितप, दत्ताराम पाष्टे, दीपक सांबरे (जिजाऊ शाखा अध्यक्ष-धामणसे), दीपक गोताड, सुनील कोलगे, दयानंद पोवार, मधुकर मांडवकर, सिद्धेश रांबडे (जिजाऊ शाखा वेतोशी अध्यक्ष), विश्वास रांबाडे (जिजाऊ शाखा वेतोशी सचिव), तुकाराम पाष्टे (जिजाऊ वेतोशी शाखा खजिनदार), सागर मायंगडे, अनंत पागदे, अनंत कुल्ये, सुनील बोटके, अजित कांबळे, विनोद बारगुडे, सचिन रांबाडे, विशाल घडशी, प्रशांत माचीवले, संतोष माचीवले, गुरुनाथ निंबरे, निलेश निंबरे, सतीश रांबाडे, संग्राम बोटके, सदाशिव बोटके, प्रणाली बारगुडे, निकिता कांबळे, प्राची कांबळे, तन्वी रांबाडे, पल्लवी रांबाडे, आदिती बोटके, अनंत पाष्टे, अनिल बारगोडे, संजय पाष्टे, सचिन गोताड, मुकेश होरंबे, साहिल रेवाळे, गार्गी टिळेकर, तसेच कोतवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला आणि इतर नागरिकांचा समावेश होता.
कार्यक्रमाला कोतवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला आणि इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यास यशस्वी केले.