गोखलेनाका परिसरात मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; ७,७५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त.

0
13

रत्नागिरी | प्रतिनिधी

शहरातील गोखलेनाका परिसरात विनापरवाना सुरु असलेल्या मटका-जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. १७ जून) दुपारी कारवाई केली. गुप्त माहितीनंतर पोलिसांनी अचानक छापा टाकत ७,७५७ रुपयांचा रोख मुद्देमाल आणि मटका साहित्यासह एकास ताब्यात घेतले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोखलेनाका येथील एका लॉजजवळ बंद टपरीच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या मटका-जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी धाड टाकली. नरेंद्र गणपत सावंत (वय ५८, रा. फणसोप-भिमनगर, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

या कारवाईदरम्यान रोख रक्कम, मटका तिकीट व इतर साहित्य असा एकूण ७,७५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल आशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संशयिताविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शहर पोलिसांकडून असे अवैध प्रकार थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे करण्यात येणार असल्याचेही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here