मुंबई | २ जुलै २०२५
राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत ४ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ३० जून ही अंतिम मुदत होती, मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या विनंतीनंतर ही मुदत चार दिवसांनी वाढवण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमांत इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनीयरिंग, आयटी, ऑटोमोबाईल इत्यादी शाखांचा समावेश आहे. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टींची तयारी ठेवावी:
- १०वी किंवा समकक्ष परीक्षेचा निकाल
- आधारकार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- पत्त्याचा पुरावा
निवड प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे गुण, आरक्षण व पर्याय निवड यावर आधारित तक्ते (Merit Lists) लवकरच जाहीर होणार आहेत.
महत्वाचं:
👉 अर्ज करण्यासाठी वेबसाइट: www.dtemaharashtra.gov.in
👉 अंतिम तारीख: ४ जुलै २०२५