संस्कृती फाउंडेशन तर्फे आदर्श शाळा भडे नं १ येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप.

0
6

लांजा:- जि.प.पू. प्रा.आदर्श शाळा भडे नं १ ता. लांजा जि. रत्नागिरी येथे दि. ३ जुलै २०२५ रोजी संस्कृती फाउंडेशन तर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मिशन आपुलकी अंतर्गत अनेक संस्था व दानशूर व्यक्ती शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात. आदर्श शाळा भडे नं १ येथे झालेल्या या कार्यक्रमात संस्कृती फाउंडेशनचे संस्थापक श्री. राजेश गोसावी ( मुख्याध्यापक, जि. प. पू प्रा. शाळा झरेवाडी , रत्नागिरी) यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास आणि कला यांचे महत्व सांगून करिअर मार्गदर्शन केले.

तसेच संस्कृती फाउंडेशनच्या कार्याची ओळख करून दिली. श्री. गौतम कांबळे ( अध्यक्ष , संस्कृती फाउंडेशन) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून शैक्षणिक साहित्याचा वापर प्रगतीसाठी करावा आणि भविष्यात आपल्या शाळेला व समाजातील गरजू मुलांना मदत करावी असे आवाहन केले. श्री. प्रवीण तेंडुलकर यांनी आपल्या मनोगतात संस्कृती फाउंडेशनच्या कामाची स्तुती करत अश्याप्रकारे मदत करत राहण्याचे आवाहन केले.

यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांचा शाल व श्रीफळ स्वरूपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुड ,निवेदन श्रीम. दळी आणि आभार प्रदर्शन श्री. बोरकर यांनी केले . या प्रसंगी श्री. ओंकार आचरेकर ( सदस्य संस्कृती फाउंडेशन , शा. व्य. स. अध्यक्ष शाळा झरेवाडी), श्री. प्रवीण तेंडुलकर ,श्री. लिलाधर कुड (मुख्या. आदर्श शाळा भडे नं१), श्री. संजीवकुमार राऊत (शिक्षणप्रेमी), श्री. प्रशांत बोरकर (पोलीसपाटील भडे) श्री. संदीपकुमार खुटाळे, श्री. अभिजित माने( शिक्षक ,भडे नं१ शाळा) आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here