हृदयविकारावर आधुनिक शस्त्र, STEMI हब आणि स्पोक मॉडेलचा जबरदस्त प्रभाव!

0
34

हृदयविकारावर सरकारची सुपरस्पीड सेवा, वेळेवर उपचार, जीव वाचवण्याची हमी!

लेखन:- हृषिकेश विश्वनाथ सावंत, MSc Zoology, M.A. Communication & Journalism, M.A. Political Science, 9145680102.

विशेष मार्गदर्शन:- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, NCD (Non Communicable Diseases) विभाग समन्वयक डॉ. यश प्रसादे.

हृदयविकाराचा तीव्र आणि जीवघेणा प्रकार असलेला STEMI (ST Elevation Myocardial Infarction) आज अनेकांचे प्राण घेणारा आजार ठरतो आहे. मात्र आता, महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत STEMI कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत हृदयविकाराच्या रुग्णांसाठी तातडीचा आणि उच्च दर्जाचा उपचार उपलब्ध करून दिला आहे. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही वेळेत उपचार मिळत असून त्यांच्या जीवाला नवसंजीवनी मिळत आहे.

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे STEMI चे लवकर निदान करणे, रुग्णांना तातडीने थ्रोम्बोलायसिससारखी clot-busting औषधे आणि गरज पडल्यास अँजिओप्लास्टीसारखा advanced उपचार उपलब्ध करून देणे आणि हृदयविकारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणे. या उद्दिष्टांसाठी जिल्हास्तरावर SPOKE म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये STEMI उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येथे ECG मशीन, जीवनावश्यक औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी २४x७ उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांना हब हॉस्पिटलमध्ये त्वरित हलवून advanced उपचार दिला जातो.

STEMI हब आणि स्पोक मॉडेल हे या योजनेचे यशस्वी उदाहरण ठरत आहे. हब म्हणून सुसज्ज मोठ्या रुग्णालयांमध्ये अँजिओप्लास्टीसारखे आधुनिक उपचार उपलब्ध असतात, तर स्पोक म्हणून ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये प्राथमिक निदान व उपचार केले जातात. ECG व अन्य तपासण्यांचे रिपोर्ट्स हब हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांना टेलिमेडिसिनद्वारे पाठवले जातात आणि त्यावर तातडीने निर्णय घेऊन रुग्णाला पुढील उपचारासाठी हलवले जाते. रुग्णवाहिकेची सेवा यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परकार हॉस्पिटल, रामनाथ हॉस्पिटल, बीकेएल वालावलकर हॉस्पिटल आणि लाईफ केअर चिपळूण ही नामांकित आरोग्यसंस्थांचे हब म्हणून कार्य सुरू आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत हृदयविकार उपचार उपलब्ध असून अनेक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे.

आज STEMI कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही वेळेत आणि अत्याधुनिक उपचार मिळू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन मोफत ECG करून घ्यावी आणि हृदयविकारासारख्या धोकादायक आजारापासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here