रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे इस्राईलमध्ये घरगुती सहाय्यक (Home Based Caregiver) म्हणून नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. २५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
काय आहेत पात्रता निकष?
✔ वय: २५ ते ४५ वर्षे
✔ शिक्षण: इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान आवश्यक
✔ प्रशिक्षण: भारत सरकार मान्यताप्राप्त काळजीवाहू (Caregiver) प्रशिक्षण (990 तासांचा कोर्स) पूर्ण असलेले प्रमाणपत्र आवश्यक
✔ इतर पात्रता:
- नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट, मिडवाइफरी प्रशिक्षण आवश्यक
- GDA/ANM/GNM/ B.Sc. नर्सिंग / Post B.Sc. नर्सिंग पात्रता असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
उमेदवारांना मिळणाऱ्या सुविधा
💰 वेतन: ₹1,31,000 पर्यंत मासिक पगार
🏠 राहण्याची व जेवणाची सोय
🩺 मेडिकल विमा उपलब्ध
📜 व्हिसा व पासपोर्टसाठी पूर्ण मदत
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी http://maharashtrainternational.com/job.aspx या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.
📲 ताज्या बातम्यांसाठी आणि संधींच्या अपडेट्ससाठी आमच्या न्यूज ग्रुपला जॉईन करा!
👉 Join Our News Group