दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषीदुतांनी सादर केले जलकुंड बांधणीचे प्रात्यक्षिक.

0
36

दापोली:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत निसर्गमित्र गटाने १८ ऑक्टोबर रोजी माणगाव तालुक्यातील कोशिंबळे येथील शेतकऱ्यांसाठी जलकुंड बांधणी हा कृषी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम कृषीदुतांनी घेतला. जलकुंड पाणी साठवण, सिंचन, मत्स्यपालन आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपयोगी ठरते. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी पद्धतींचा वापर करून जलकुंडाची बांधणी अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनवली. सदरील जलकुंडाचे आकारमान ४ मी. x २ मी. x १ मी. एवढे आहे ज्याची पाणी साठवण क्षमता ८००० लिटर इतकी आहे. श्री. अशोक मांजरे यांच्या शेतावर या जलकुंडाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. जलकुंड पाणी साठवून वर्षभर सिंचनासाठी उपलब्ध करून देते.

कुंडातील पाणी गरजेप्रमाणे शेतांना सिंचन करण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते. या व्यतिरिक्त कुंडात मत्स्यपालन केले जाऊ शकते, ज्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळते. जलकुंड पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ते जैवविविधतेचे संरक्षण करते आणि वन्यजीवांना आश्रय देते. या विद्यार्थ्याना कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद मयेकर, कृषी विज्ञान केंद्र,किल्ला- रोहा चे प्रमुख डॉ.मनोज तलाठी व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. जीवन आरेकर, विषय तज्ञ डॉ. सचिन पाठक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रात्यक्षिकाचे आयोजन जीवन गोडसे, आकाश जाधव, अनिश जगताप, अनिकेत काजरेकर, रिषभ मोरे, लक्ष्मण माळगी, सुमेध वाकळे यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here