गणराज क्लबची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत 19 पदकांची कमाई; बरखा संदे ‘बेस्ट फायटर’ पुरस्काराने सन्मानित.

0
33

रत्नागिरी:- रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धा २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे ७०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

गणराज क्लबच्या खेळाडूंनी या स्पर्धेत १९ पदकांची कमाई करत उल्लेखनीय यश मिळवले.

पदक विजेते खेळाडू

सब-ज्युनियर गट सुवर्ण पदक: तीर्था मकवाना, बरखा संदे, रुद्र जाधव
कांस्य पदक: आदित्य मोरे, विहान शेटये
स्पेशल गट सुवर्ण पदक: स्पर्श रेडीज, तुषांत विलणकर
कांस्य पदक: निरज मकवाना, युबना संदे
कॅडेट गट कांस्य पदक: अखिलेश वांयगणकर
ज्युनियर गट सुवर्ण पदक: त्रिशा मयेकर, गौरी विलणकर
रौप्य पदक: समर्थ विचारे, स्वांनद तुपे
कांस्य पदक: आदया कवितके, सोनाक्षी यादव
सिनियर गट सुवर्ण पदक: गौरी विलणकर
रौप्य पदक: त्रिशा मयेकर
कांस्य पदक: स्वांनद तुपे

बरखा संदे हिला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून ‘बेस्ट फायटर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, आणि युवा मार्शल आर्ट क्लबच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.

या यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक प्रशांत मकवाना (एशियन युनियन कोच), महिला प्रशिक्षक आराध्या मकवाना, आणि NIS प्रशिक्षक अनिकेत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here