प्रकल्प कोणता याचा पत्ता नाही तरीही वाटद येथील ग्रामस्थांना जमीन अधिग्रहणाच्या नोटिसा!

0
73
रत्नागिरीच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ.

जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत दिले निवेदन व केली विस्तृत चर्चा.

रत्नागिरी:- आज दिनांक ३/१०/२०२४ रोजी मौजे वाटद, ता. जि. रत्नागिरी येथील ग्रामस्थांना एमआयडीसी प्रकरणी आलेल्या नोटिस मध्ये माहितीचा अभाव असल्याने वाटद मध्ये कोणत्या प्रकारचा प्रकल्प येतोय?, या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त होणार आहे का?, अनेक ग्रामस्थ विस्थापित होणार आहेत, तर त्या नागरिकांचे काय होणार, प्रकल्प विनाशकारी आहे का?, अशा प्रकारचा संभ्रम वाटद येथील ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. सदर संभ्रम अपूर्ण माहितीमुळे निर्माण झाला आहे.

वाटद येथे येणाऱ्या प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध नसून मात्र प्रकल्पाची पूर्वकल्पना ग्रामस्थांना व जमीन अधिग्रहीत होणाऱ्या नागरिकांना द्यायला हवी व त्यासंदर्भात तपशीलवार माहिती ग्रामस्थांना मिळायला हवी असे मत ग्रामस्थांचे आहे. या विषयी प्रशासनाकडून अधिक माहिती मिळावी याकरिता जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेमार्फत रत्नागिरीच्या प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले, त्यांच्याशी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न मांडले व विस्तृत चर्चा केली.

या प्रसंगी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सचिव श्री.केदार चव्हाण , जिल्हाध्यक्ष श्री. प्रथमेश गवाणकर, संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍड. महेंद्र मांडवकर यांच्या समवेत वाटद, खंडाळा परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. जिजाऊच्या पदाधिकाऱ्यांनी सदर विषयात त्वरित लक्ष घालत हा विषय प्रशासनाकडे मांडल्याबद्दल उपस्थित सर्व ग्रामस्थांनी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे व सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here