जिल्हा पोलीस दलाकडून आंबा बागायतदार, बोट मालकांची बैठक संपन्न! ऑनलाईन पद्धतीने दीड हजार लोक सहभागी

0
70

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली बैठक!

परराज्यातील कामगार, नेपाळी खलाशी, कामगार यांची माहिती पोलीस प्रशासनाला देण्याचे जिल्ह्यातील आंबा बागायतदार, बोट मालकांना आवाहन!


रत्नागिरी:- नेपाळी खलाशी, नेपाळी कामगार तसेच आणि परराज्यातून येणारे कामगार यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य अधिक घडत असल्याचे मागील काही अनुभवांवरून लक्षात आले आहे. या कामगारांची, खलाशांची माहिती पोलिसांकडे नसल्याने बऱ्याचदा तपासात अडचणी निर्माण होतात. म्हणूनच आंबा बागायतदार आणि बोट मालक यांची संयुक्त बैठक आज  (१० ऑगस्ट) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत घेण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उप अधीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्यासह आंबा बागायतदार आणि बोट मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्हाभरातील पोलीस ठाण्यातील पोलीस आणि दीड हजार नागरिक ऑनलाइन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here