मुंबई:- राज्यपाल नियुक्त कोट्यातून सत्यवान यशवंत रेडकर यांचे नामनिर्देशन व्हावे, यासाठी महाराष्ट्रभर ई-मेल मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांना उद्देशून ई-मेल पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोहिमेच्या आयोजकांनी राज्यघटनेत नमूद केलेल्या तरतुदींना अनुसरून, कला, साहित्य, समाजसेवा, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील विशेष योगदान असलेल्या व्यक्तींना राज्यपाल कोट्यातून नामनिर्देशित करावे, अशी मागणी केली आहे. सत्यवान रेडकर हे “तिमिरातुनी तेजाकडे” या सामाजिक संस्थेचे संस्थापक असून, अनेक वर्षांपासून समाजसेवेत मोलाचे कार्य करत आहेत. ते स्वतः उच्चशिक्षित असून प्रशासनातील जवळपास १४ वर्षांचा त्यांना अनुभव आहे. त्यांचे अनुभव, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील योगदान, कोकण तसेच महाराष्ट्रातील मोठा जनसंपर्क लक्षात घेता त्यांना या कोट्यातून संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोहिमेचे संयोजक इच्छुक नागरिक आणि हितचिंतकांना cm@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर माननीय मुख्यमंत्री यांना ई-मेल पाठवण्याचे तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करत आहेत. यासाठी ई-मेलचा तयार मजकूरही दिला गेला आहे, जो प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक ई-मेल आयडीवरून पाठवावा. या मोहिमेला गती देण्यासाठी लोकांना ब्रॉडकास्ट लिस्ट, सामाजिक गट, आणि मित्रमंडळींच्या संपर्कातून मोहिमेचा प्रसार करण्याचे आवाहन केले आहे.
मागील काही सरकारांच्या कारकिर्दीत अपवादात्मक परिस्थिती वगळता प्रामुख्याने राजकीय व्यक्तींना प्राधान्य दिले गेले होते. मात्र, राज्यघटनेच्या तरतुदींनुसार अशा नामनिर्देशनांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आणि शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाविष्ट करणे अपेक्षित आहे.
संपर्कासाठी तपशील
सत्यवान यशवंत रेडकर (संस्थापक, तिमिरातुनी तेजाकडे)
मोबाईल: 9969657820
सचिन यशवंत रेडकर (अध्यक्ष, तिमिरातुनी तेजाकडे)
मोबाईल: 9768738554
हितचिंतक आणि सामाजिक गट मोठ्या प्रमाणावर या मोहिमेत सहभागी होत आहेत. मोहिमेचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी या विषयावर आपले मत व्यक्त करणे आणि योग्य व्यक्तींना विधान परिषदेत राज्यपाल कोट्यातून संधी देण्याचा आग्रह धरणे हा असल्याचे संस्थेने सांगितले आहे.