दापोली : तहसीलदार कार्यालय दापोली व दापोली तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेमध्ये सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड कै पद्मश्री श्री. म. तथा अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज टाळसुरे विद्यालयातील श्रेया मांडवकर द्वितीय, मनाली जाधव तृतीय क्रमांकाची तर मानसी गार्डी विशेष सहभाग पारितोषिकाची मानकरी ठरली. यशस्वी विद्यार्थ्यांना दापोली तालुक्याच्या तहसीलदार अर्चना बोम्बे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून दापोली तालुक्यातील ग्राहक गट स्थापन केलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन तहसीलदार कार्यालय दापोली व अखिल भारतीय ग्राहक पंचायत दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. जागो ग्राहक जागो, ग्राहक चळवळ काळाची गरज अशा विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पालगड हायस्कूल मधील श्रावणी गायकवाड या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक तर अनन्या मुंगशे विशेष सहभाग पारितोषिक पटकावले तहसीलदार कार्यालय दापोली येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी दापोली तालुक्यातील स्वस्थ धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, सद्यासदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी तहसीलदार अर्चना बोम्बे यांनी ग्राहक चळवळीची आवश्यकता विशद केली. ग्राहकांचे हक्क कर्तव्य सांगत असताना धान्य दुकानदारांनी कोणती काळजी घ्यावी याचेही विवेचन केले. सुशासन सप्ताह अंतर्गत कर्मचार्यांना मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी दापोली तहसीलदार अर्चना बोम्बे, दापोली तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष कमलेशा मुसलोणकर, ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य वसंत आंबेकर,जिल्हा उपाध्यक्ष संदेश राऊत, तालुका सचिव ॲड. मनीषा जोशी, पुरवठा अधिकारी रवी इढोळे, पुरवठा निरीक्षक ओंकार राणे, रोशन मंडपे आदी मान्यवर उपस्थित होते.