राजापूर / प्रतिनिधी – येथील मराठा समाज सेवा संघ, राजापूरचे अध्यक्ष भालचंद्र तावडे यांचे पुणे येथे रविवारी सकाळी वृध्दापकाळाने दुखद निधन झाले आहे. गेली अनेक वर्ष त्यानी मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष पद भुषविताना राजापूर तालुक्यीतील ग्रामिण भागात विखुरलेल्या मराठा बांधवाना एका झेंड्याखाली आणण्याचे काम केले होते. राजापूर तालुक्यातील मराठा समाजासाठी त्यानी केलेले काम उल्लेखनिय होते . गेले काही वर्ष ते पुणे येथे वास्तव्यास होते.
मात्र रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी त्यांचे वृधापकाने निधन झाले . त्यांच्या निधनाने मराठा समाज सेवा संघाचे न भरु येणारे नुकसान झाले आहे .