लांजा:- जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती शिक्षण विभाग, लांजा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, लांजा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील स्पर्धेचे उद्घाटन लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी जोमाने सहभाग घेतला. जि.प. केंद्रशाळा साटवली मराठीची विद्यार्थिनी रोझी हुसेन बरमारे हिने लहान गट मुलींच्या थाळीफेक प्रकारात दुसरे स्थान पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे तिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. आयोजकांनी क्रीडा क्षेत्रात मुलांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले पाहिजे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
उल्लेखनीय यशासाठी रोझीचे अभिनंदन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.