लांजा तालुक्याच्या केंद्र शाळा खावडी कब्बड्डी संघांचे जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत यश.

0
24

डेरवण:- डेरवण येथे ८ जानेवारी २०२५ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कब्बड्डी स्पर्धेत लांजा तालुका (केंद्र शाळा खावडी) कब्बड्डी संघाने मोठा गट मुली व मुलींच्या गटात उपविजेतेपद पटकावले.

लांजा तालुक्याच्या या संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ सादर करून उपविजेते म्हणून आपले स्थान निश्चित केले. या यशामध्ये सर्व खेळाडू, शिक्षक व प्रशिक्षक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

यावेळी संघाने दाखवलेल्या मेहनत आणि एकजुटीने तालुक्याची मान उंचावली आहे. मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर संस्थेच्या वतीने सर्व खेळाडू, शिक्षकआणि प्रशिक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here