शिरगाव येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे भव्य महाआरोग्य व नेत्रदान शिबिर उत्साहात संपन्न.

0
56

शिरगाव – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव येथे मोफत महाआरोग्य व नेत्रदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराला शिरगाव आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक आरोग्य जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात रोपवाटिकेस जलार्पण करून करण्यात आली. महामार्गाच्या कामांमुळे तोडल्या गेलेल्या झाडांची भरपाई करण्यासाठी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश संस्थेच्या वतीने देण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांनी मांडली होती.

शिबिराची भव्य सुरुवात आणि मान्यवरांची उपस्थिती

शिबिराची सुरुवात सकाळी १० वाजता दीपप्रज्वलन आणि महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. प्रमुख पाहुण्यांमध्ये जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, शिरगाव ग्रामपंचायत सरपंच फरीदा काझी, युवा नेते सुरज शेट्ये, सुप्रसिद्ध आंबे व्यवसायिक सुरेश शेट्ये, ॲड. शिवराज जाधव, जुबेर काझी, रत्नदीप कांबळे, मिलिंद खेर, ग्रामपंचायत सदस्य सचिन सनगरे, स्नेहा भरणकर, अंकिता सनगरे, रमजान शेख, फणसोपचे संजय साळवी आणि युवा नेते चंद्रशेखर (बंटी) महाकाळ यांचा समावेश होता.

शिबिरात आरोग्य सेवांचा व्यापक लाभ

या शिबिरात मुंबई आणि ठाणे येथून आलेल्या तज्ञ डॉक्टर आणि नर्सेसच्या पथकाने उपस्थित नागरिकांना मोफत आरोग्य सेवा दिली. शिबिरात –
३५० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
५० हून अधिक नागरिकांची मोफत डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली.
२ जनरल शस्त्रक्रिया लवकरच पार पडणार आहेत.
उच्च रक्तदाब, मुतखडा, हर्निया, मुळव्याध आणि पिस्तुला यांसारख्या आजारांवरील मोफत शस्त्रक्रियांची सोय करण्यात आली.
ईसीजी तपासणी, मोफत औषध वितरण आणि आरोग्य सल्ला देण्यात आला.
गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाऊ संस्थेच्या टीमची कठोर मेहनत; अनेकांनी केले सहकार्य!

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र रावणांक यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सुबहान तांबोळी, गजानन भरणकर, राजा शेख, अभिजीत गायकवाड, रेश्मा तांबोळी, विशाखा घडशी, समृद्धी पवार, करीम तांबोळी, अजिंक्य सनगरे, साहिल रेवाळे, साहिल गोरे, हृतिक चव्हाण, साईराज कोलते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

या उपक्रमातून सामाजिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश देत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांनी समाजहितासाठी योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here