चिपळूण:- चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. शेखर निकम यांची शृंगारपूर ग्रामस्थांनी भेट घेतली. त्यांच्या विजयाबद्दल, सरांचे शृंगारपूर गांव आणि “शृंगारपूर ग्रामविकास मंडळ मुंबई”च्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री निकम यांनी शृंगारपूर गावांमध्ये केलेल्या विकासाला यावेळी शृंगारपूरातील मतदारांनी भरभरुन मतदान केले आणि गावांमध्ये १०१ मतांची आघाडी मिळवून दिली. अटितटीच्या या सामन्यात शृंगारपूर गांव आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला त्याबद्दल सरांनी शृंगारपूरातील ग्रामस्थांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शृंगारपूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल चव्हाण, कार्यकारिणी सदस्य श्री. गजानन चव्हाण, संगमेश्वर उत्तर मंडळ भाजपा तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, राजेंद्र म्हस्के, दीपक म्हस्के, मंगेश पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.